IntriKate Consulting LLP संस्थेविषयी

संस्थेविषयी

इंट्रिकेट कन्सल्टिंग एलएलपी ही महाराष्ट्रात नोंदणीकृत मर्यादित दायित्व भागीदारी असून ती पुणे येथून कार्यरत आहे. गुंतागुंतीचे धोरण आणि नियमन यांचे रूपांतर कृतीयोग्य निर्णयांमध्ये करणे, हे संस्थेचे प्रयोजन आहे.

नाव

intricate + Kate = IntriKate

हे नाव दोन शब्दांच्या जोडणीतून बनले आहे: intricate (गुंतागुंतीचे) — आम्ही हाती घेतो त्या प्रश्नांचे स्वरूप — आणि Kate (काटे) — आमच्या व्यवस्थापकीय भागीदारांचे आडनाव. IntriKate मधील मोठे K ही जोडणी दर्शवते.

आम्ही स्वतःसाठी ठरवलेली मानके

  • अचूकता

    प्रत्येक विधानासोबत अचूक संदर्भ. प्रत्येक आकड्यासोबत त्याची आकडेमोड.

  • उत्तरदायित्व

    प्रत्येक कार्यनियुक्तीचे नेतृत्व एक नामनिर्दिष्ट भागीदार करतात आणि तेच तिला अंतिम मान्यता देतात.

  • सचोटी

    हितसंघर्षांचे प्रकटीकरण, कोणतेही प्रलोभन नाही, उसन्या अधिकाराचा आव नाही.

  • प्रमाणबद्धता

    प्रश्न सोडवणारा कमीत कमी हस्तक्षेप, ग्राहकाला समर्थनीय ठरवता येईल अशा खर्चात.

भागीदार

हर्षल काटे

व्यवस्थापकीय भागीदार

हर्षल काटे संस्थेच्या शासनव्यवस्था, नियमन आणि शाश्वतता प्रकटीकरणविषयक कामाचे नेतृत्व करतात.

त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT Bombay) येथील सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह्ज फॉर रूरल एरियाज (CTARA) मधून M.Tech आणि विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथून B.Tech पदवी प्राप्त केली आहे. शासकीय विधि महाविद्यालय, मुंबई (Government Law College) येथे ते LLB चे शिक्षण पूर्ण करत आहेत.

त्यांनी ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यासोबत काम केले आहे. भारतीय सूचीबद्ध कंपन्यांनी केलेल्या व्यावसायिक जबाबदारी व शाश्वतता अहवालनाचा (Business Responsibility and Sustainability Reporting) — IFRS S1/S2, ESRS, GRI आणि TCFD यांच्या तुलनेत — अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.

अधिछात्रवृत्ती

  • HAL Fellow (CSR)
  • MoRD Fellow (ICT4D)
  • Future of India Fellow

हर्षल काटे हे नोंदणीकृत अधिवक्ता नाहीत. संस्था विधि व्यवसाय करत नाही.

भाग्यश्री जाधव

नियुक्त भागीदार

भाग्यश्री यांत्रिकी अभियंता आहेत. उत्पादित वस्तूंचे जीवनचक्र मूल्यांकन (LCA), चक्रीयता (सर्क्युलॅरिटी) आणि डीकार्बनायझेशन या विषयांवर त्या काम करतात.

त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अवसरी, पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये B.E. आणि कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाइनमध्ये M.Tech केले आहे.

कमिन्स इंडिया, जॉन्सन कंट्रोल्स आणि डॅनफॉस येथे त्यांनी उत्पाद अभियांत्रिकी व संशोधन-विकास क्षेत्रात काम केले आहे; डॅनफॉसमध्ये त्या एका उत्पाद विभागाच्या ESG प्रमुख होत्या. उद्योगातील पूर्णवेळ जबाबदारी सांभाळून त्या फर्मला अभियांत्रिकी व जीवनचक्राशी संबंधित प्रश्नांवर सल्ला देतात.

कार्यक्षेत्रे

  • जीवनचक्र मूल्यांकन
  • चक्रीयता
  • उत्पादनांचे डीकार्बनायझेशन
  • उत्पादनक्षम रचना

संस्थेची शासनव्यवस्था

दोन्ही भागीदार मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम, 2008 अंतर्गत नियुक्त भागीदार आहेत. संस्था इतिवृत्त पुस्तिका, हितसंघर्ष नोंदवही आणि प्रत्येक कार्यासाठी स्वतंत्र कार्यनियुक्ती धारिका ठेवते, आणि संस्थेचे लेखे उपार्जन तत्त्वावर ठेवले जातात.